मुंबई: सर्वांना उत्सुकता लागलेल्या मान्सूनचे अखेर केरळमध्ये आज आगमन झाले असून, पुढील आठवड्यात तो महाराष्ट्रात दाखल होण्याची शक्यता आहे, अशी माहिती भारतीय हवामान विभागाकडून देण्यात आली आहे.
दरवर्षी ७ ते १० जूनपर्यंत राज्यात दाखल होणारा मान्सून यंदा एक आठवडाभर उशिराने दाखल होण्याची शक्यता आहे. गेल्या दोन-तीन दिवसांपासून केरळमध्ये मान्सूनला अनुकूल वातावरण निर्माण झाले होते. अखेर आज केरळमध्ये मान्सून दाखल झाल्याची अधिकृत घोषणा भारतीय हवामान खात्याने केली. कर्नाटकच्या किनारपट्टीवर पावसाला सुरूवात झाली आहे. आता लवकरच महाराष्ट्रातही पाऊस बरसेल.